ईपीएस ९५ चे यशस्वी आंदोलन; जळगाव जिल्हयातून पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा सहभाग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात नवीदिल्‍ली येथील जंतरमंतर येथे दि ३१ जूलै रोजी झालेल्या आंदोलनाला यश आले असून केंद्रीय कामगार मंत्री व इपीएफओने यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांसह सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते.

कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ (ईपीएस -९५) अंतर्गत किमान मासिक पेन्शन ७,५०० रुपये करण्यासह त्यांच्या दुसर्‍या मागणीच्या समर्थनार्थ हजारो पेन्शनधारकांनी ३१ जुलै २०२४ रोजी यशस्वी आंदोलन केले. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या विनंतीवरून व माननीय श्री धैर्यशील माने खासदार, कोल्हापूर (हातकणगले) यांच्या आवाहनावरून महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या खासदारांची बैठक व चर्चा झाली, राष्ट्रीय संघर्ष समीतीच्या संयुक्त विद्यमाने ईपीएस -९५चा अखंड संघर्ष गेल्या ८ वर्षांपासून पेन्शनधारक आणि त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होण्यासाठी तोडगा काढण्याच्या उद्देशाने झालेल्या बैठकीत कमांडर अशोक राऊत जी यांनी वस्तुस्थिती सांगितली. आणि पुराव्याच्या आधारे ईपीएस -९५ पेन्शनधारकांची बाजू मांडली. पेन्शनधारकांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ अंतर्गत मिळणार्‍या कमी पेन्शनमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जगणे कठीण झाले आहे.

केंद्रीय कामगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी (ईपीएस -९५ ) टीमला चर्चेसाठी बोलावले. ते लवकर सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, हे आश्वासन नसून पंतप्रधान त्यासाठी कटिबद्ध आहेत. मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय सरचिटणीस वीरेंद्र सिंह राजावत, राष्ट्रीय मुख्य समन्वयक डॉ.रमाकांत नरगुंड उपस्थीत होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील छत्रपती साहू महाराज, सौ. शोभा ताई बच्छाव, खासदार, धुळे (काँग्रेस), नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, कल्याण काळे, भास्करराव भागो, खासदार दिंडोरी (राष्ट्रवादी, शरद पवार), राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक (उबाठा), भाऊसाहेब वाकचोरे, खासदार, शिर्डी. .उबाठा), ओमराजे निवाळकर, बंटू जाधव यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

तातडीच्या बैठकीत ईपीएस -९५ च्या टीमला संबंधित विभागाच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले.या सर्व खासदार साहेब यांनी भाषणात ( ईपीएस ९५ ) संदर्भात पेन्शन वाढीव बद्दल संसदेमध्ये आक्रमकपणे प्रश्न मांडू व जोपर्यंत केंद्र सरकार तुमचा तुमचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू उभे अशी ग्वाही सर्व.ऊपस्थित खासदारांनी दिली. यावेळी कमांडर अशोक राऊत साहेब यांनी आपल्या भाषणात सर्व खासदार साहेब यांचें आभार मानले तसेच हा प्रश्न ३१ आगष्ट पर्यंत जर केन्द्र सरकारने सोडविला नाही तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम या सरकारला भोगावे लागले असे सांगितले.यावेळी संघटनेतील ज्येष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शनपर विचार व्यक्त केलीत.जळगांव जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे.जळगांव जिल्हा उपाध्यक्ष रमेश बी.नेमाडे.कार्याध्यक्ष संजिव बी.खडसे.कौतिक किरंगे हेमराज चौधरी भुसावळ तालुका अध्यक्ष मिठाराम एम.सरोदे,दिलिप किरंगे.जामनेर तालुका.श्री हरि व्यवहारे,पितांबर सपकाळे झुलाल पाटील इसह सदस्यांनी सहभाग नोंदवला.

Protected Content