जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्हायरलच्या धर्तीवर शालेय विदयार्थ्याच्या आरोग्य तपासणीसाठी गोदावरी सीबीएसई स्कुल जळगावने पुढाकार घेतला असून विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आली.
१ ते ५ ऑगस्ट दरम्यान आयोजित या शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ. साईकेत बासू, डॉ.जान्हवी बनकर,दंतरोग, डॉ.प्रज्ञा निघोट, डॉ. आशा भोई, आकाश चौधरी बालरोग ओमश्री गुडे, डॉ. सयानी चक्रवर्ती, डॉ चैतन्य केलुस्कर,डॉ. कुशल ढाके, डॉ सई चमलवार आणि मेडिसिन विभागाचे तज्ञ डॉ. तेजस खैरनार, डॉ. हर्ष त्रीपाठी, डॉ. सचिन संगपवाड, डॉ. मोहीत वाघ, डॉ रिषभ पाटील यांनी विदयार्थ्यांची उंची, वजन, यासह तपासणी केली. या तपासणीतून ज्या बालकांना पुढील उपचाराची गरज होती त्यांच्या पालकांना मार्गदर्शन देखिल करण्यात आले तसेच लहान बालकांच्या विविध आरोग्य समस्याबाबत देखिल तज्ञांनी मार्गदर्शन केले.
स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी पालकांना संबोधित करतांना सध्या साथीच्या रोगाचे थैमान सूरू असून व्हायरलमूळे अनेक विदयार्थी व पालक आजारी पडत असल्याने शालेय प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला असून पाल्यांची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. पाल्याबरोबर अनेक पालक या शिबिरात सहभागी झाले असून उत्सुकता म्हणून स्वताची देखिल तपासणी करून घेत असल्याचे दिसून आले.