राहूल शेवाळेंच्या मानहानीप्रकरणी उद्धव ठाकरे व संजय राऊतांना २ हजारांचा दंड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटातील माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना २ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. यानंतर शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. याप्रकरणी काही महिन्यापूर्वी ठाकरे आणि खासदार राऊतांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी १ हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित २ हजार रुपये असा दंड दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने दिले आहेत.

Protected Content