मालाडमध्ये भरधाव टेम्पोने नर्सला उडवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईमधील मालाड येथे एका भरधाव टेम्पोने एका नर्सला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रेहाना मालपेकर असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मालाड येथे शनिवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार रेहाना मालपेकर या मालाड रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी जात असताना एका भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. मालाड पोलिसांनी टेम्पो चालक आरिफ शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मालपेकर यांच्या २१ वर्षीय मुलाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

रेहाना मालपेकर या रिद्धिविनायक हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करत होत्या. तर जहीर हा वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. शनिवारी दुपारीच्या सुमारास रेहाना त्यांची शिफ्ट संपवून हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या. रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी त्या त्यांच्या मुलाला भेटल्या. दरम्यान, रेल्वे स्थानकाकडे जात असतांना एक भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना त्यांच्या रुग्णालयातील दुसरा वॉर्ड बॉय प्रशांत कांबळे याने पाहिली. त्याने जखमी रेहानाला ऑटोने रुग्णालयात परत आणले. कांबळे अयणे साईनाथ शॉपिंग सेंटरजवळून जात असतांना रेहानाला एका टेम्पोने धडक दिल्याचे दिसले. त्याने तातडीने टेम्पोचा क्रमांक नोंदवला होता. याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content