निवडणूकीच्या निधीवरून बसपमध्ये संघर्ष; पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बसपची राज्य कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ५० लाखांच्या निधीची चर्चा झाली. या प्रकरणानंतर बसपचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह अनेकांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. तसेच पैसे पोहचले नसल्याची ज्यांनी तक्रार केली, त्या हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा बसप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत पैशांवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष निर्माण झाला आहे. पक्षाला मिळालेला निधी काही जणांनी परस्पर हडप केल्याची तक्रार येताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या चौकशीनंतर काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

बसपने या लोकसभेला राज्यातील ४८ पैकी ४७ जागा लढविल्या होत्या. वाशिम-यवतमाळ मतदारसंघात बसपकडून बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड उमेदवार होते. येथे शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होती. राजश्री पाटील या मतदारसंघाबाहेरच्या असल्याने त्यांना येथे निवडणूक अडचणीची झाली होती. या निवडणुकीदरम्यान बसप उमेदवाराला एका पक्षाकडून ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली. पण ती मदत बसपच्या तत्कालीन उपाध्यक्षाने राठोड यांच्यापर्यंत पोहचवलीच नाही. राठोड यांनी निवडणूक संपल्यावर त्यासंदर्भात लेखी तक्रार बसप प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्याकडे केली. शिवसेना शिंदे गटाकडून ही मदत देण्यात आली होती, असे बसपच्या उमेदवाराचे म्हणणे आहे.

Protected Content