Home Cities मुक्ताईनगर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत घोडसगाव जि.शाळा तालुक्यातून प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत घोडसगाव जि.शाळा तालुक्यातून प्रथम


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मार्फत घेण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह मुक्ताईनगर येथे झालेल्या गुणगौरव सोहळ्यात मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसगाव येथील मुख्याध्यापक अनिल पवार ,शिक्षक भिका जावरे सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे , स्वाती भंगाळे मॅडम ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलकंठ भगत, सदस्य विनोद जावरे वैशालीताई खोदले यांचा तीन लाख रुपयाचा चेक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री मदनजी मोरे साहेब यांच्यासह बी आर सी स्टॉप, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound