Home क्राईम ग्रामपंचायत मालकीची तार, पथदिवे आणि केबल वायरची चोरी

ग्रामपंचायत मालकीची तार, पथदिवे आणि केबल वायरची चोरी


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सोनवद गावातील स्मशानभूमीजवळ ग्रामपंचायतीचे मालकीचे अल्युमिनियमचे तार, पथदिवे आणि इलेक्ट्रिक केबल वायर असे एकूण १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २७ जून रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार १८ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सोनवद खुर्द गावाजवळील स्मशानभूमीच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीचे अल्युमिनियमचे तार, पथदिवे आणि इलेक्ट्रिक केबल वायर ठेवण्यात आली होती. दरम्यान २७ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अल्युमिनियमचे तार, पथदिवे आणि इलेक्ट्रिक केबल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी गावातील ग्रामसेवक जयश्री गणेश पाटील यांनी धरणगाव पोलीसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound