नोकरीवरून काढल्याच्या संशयावरून एकाला शिवीगाळ जीवेठार मारण्याची धमकी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील जिओ टेलिकॉम ऑफिससमोर नोकरीवरून काढल्याच्या संशयावरून एकाला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची प्रकार घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, इर्शाद युसुफ शेख (वय – ४०, रा. खडकारोड, भुसावळ) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिलायन्स जिओ या कंपनीत तो कामाला आहे. दरम्यान त्याच्या परिसरात राहणारा सुमित मगरे याने त्याला नोकरीवर काढून टाकल्याच्या संशयावरून इर्शाद युसुफ शेख याला शिवीगाळ करून त्याला शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुमित मगरे रा. भुसावळ याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.

Protected Content