केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारात केली वाढ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ केली आहे. त्यानुसार आता जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांना पोलीस आणि प्रशासकीय सेवेसंदर्भातील काही अधिकार प्राप्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने विविध चर्चांनादेखील उधाण आलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने २०१९ च्या जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्याच्या कलम ५५ मध्ये सुधारणा केली आहे. अधिसुचना जारी करत केंद्र सरकारने या संदर्भातील माहिती दिली आहे. या नवीन बदलानुसार, आता नायब राज्यपालांच्या सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारात वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांना पोलीस आणि प्रशासकीय सेवेसंदर्भातील काही अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय ॲडव्होकेट जनरल यांची नियुक्ती आणि लाचलूचपत विभागाशी संबंधित निर्णयदेखील आता नायब राज्यपाल घेऊ शकणार आहेत.

 

Protected Content