पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा – एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपुर्ण जळगांव जिल्ह्यातील ज्वारी खरेदी बंद आहे.रब्बी पणन हंगाम 2023-2024 किमान आधारभुत योजने अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदी योजना, ही गेल्या महिन्या भरापासून सुरु करण्यात आली होती. परंतु गेले 12 दिवस झाले खरेदी बंद करण्यात आली आहे. यासाठी योजनेचे ऑनलाईन पोर्टल बंद असल्याने ज्वारी खरेदी बंद असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. परिणामी हजारो शेतकरी हे ज्वारी खरेदी पासुन अद्याप वंचित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी हे आधारभुत केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे 27 जुन 2024 पासुन ऑनलाईन ज्वारी खरेदीचे पोर्टल एन. ई. एम. एल. हे बंद पडले आहे. त्यामुळे ही खरेदी पुर्णतः बंद पडली आहे. 31 जुलै 2024 ही ज्वारी खरेदीची शेवटची मुदत आहे, त्याकरिता लवकरात लवकर ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात यावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब व अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण कायदा विभागाचे मुख्य सचिव रणजितसिंह देओल साहेब यांची भेट घेत लेखी निवेदनही दिली.