यावल बसस्थानकात चोरट्यांनी केली हाथसफाई; पोलिसांनी केली प्रवाशांची झाडाझडती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल आगाराच्या बस स्थानकावर गेल्या दिवसांपासून वारंवार प्रवाशांचे महागडे मोबाईल ,पर्स व पैसे चोरण्याच्या प्रमाणात वाढ झाली असुन,या ठीकाणी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी यावलचे आगारप्रमुख दिलीप महाजन यांच्यासह प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावलच्या बस स्थानकावर आज ९ जुलै रोजी सकाळी ११ ते ११ .१५ वाजेच्या दरम्यान चालक आर पी मोरे व वाहक अरूण तडवी यांनी बस क्रमांक एमएच २० बिएल १४०३ ही बस यावल ते रावेर एसटी बस प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी यावलच्या बस स्थानकावर लावली असता यातील प्रवाशी आशालता लक्ष्मण निमगडे (राहणार अडावद तालुका चोपडा) व राजेन्द्र किसन जाधव (राहणार यावल) या बस मध्ये बाहेरगावी जाण्यासाठी बसले असले असता बस मध्ये अज्ञात चोरटयांनी आशालता निमगडे यांच्या पर्स मधुन सुमारे ३०हजार रूपये किमतीची महागडी घडयाळ व काही पैसे तसेच राजेन्द्र जाधव यांच्या खिशातुन तीन हजार रूपये त्या अज्ञात चोरट्यानी काढून घेतल्याची घटना घडली असून सदर वाहक व चालक यांनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रवाशांची चौकशी करावी अशी मागणी केली असता, यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोहन तायडे, वसीम तडवी व नरेन्द्र बागुले यांनी व एस टी आगारातील यांनी महिलांची तपासणी केली. एसटी बसच्या सर्व प्रवाशांची चौकशी केली मात्र काही मिळुन आले नाही.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी केलेल्या कृत्यामुळे प्रवाशांचे दोन तास निकामी गेले व त्यांना त्रास सहन करावा लागला अखेर चौकशी पुर्ण झाल्यावर ही एसटी बस आपल्या मार्गावर मार्गस्थ झाली. याबाबत संबधीत ज्या प्रवाशांची चोरी झाली आहे ते तक्रार देण्यासाठी यावल पोलीस ठाण्यात गेले आहे.यावलचे बसस्थानक हे चोरट्यांचे माहेरघर बनले असुन ,या आदी या बस स्थानकावरून अनेकांचे मंगळसुत्र, सोन्याचे दागीने, मोबाईल व पैसे चोरीस गेले आहे.या ठिकाणी बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी यावलचे आगार प्रमुखांसह अनेक प्रवाशांकडून करण्यात येत आहे .

Protected Content