डब्लूडब्लूई रेसलर जॉन सीनाने केली निवृत्तीची घोषणा

न्युयार्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डब्लूडब्लूईच्या रिंगणात भल्याभल्या आसमान दाखवणारा स्टार कुस्तीपटू जॉन सीनाने निवृत्तीची घोषणा केली. लवकरच तो त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीवर पूर्णविराम लावणार आहे. जॉन सीनाने ‘मनी इन द बँक २०२४’ च्यादरम्यान निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. या कार्यक्रमात जॉन सीना ‘द लास्ट टाइम इज नाऊ’ लिहिलेला टी-शर्ट घालून आला होता. १६ वेळच्या विश्वविजेत्याची अचानक निवृत्ती घेतल्याने त्याचे चाहते निराश झाले. जॉन सीना २०२५ मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमधील शेवटचा सामना खेळेल, अशीही त्याने माहिती दिली.

डब्लूडब्लूई युनिव्हर्सला संबोधित करताना जॉन सीना म्हणाला की, “मी इथे का आहे? मी डब्लूडब्लूईमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे. २०२५ च्या जानेवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर येत आहे, ज्यात मला सहभागी व्हायचे आहे. ही पहिलीच वेळ आहे आणि मी तिथे येईन. २०२५ चा रॉयल रंबल हा माझा शेवटचा सामना असेल. २०२५ एलिमिनेशन चेंबर हे माझे शेवटचं असेल. लास वेगासमध्ये रेसलमेनिया २०२५ हा मी भाग घेणारा शेवटचा रेसलमेनिया असेल, असे जाहीर करण्यासाठी मी आज रात्री येथे आलो आहे”, असे सीना म्हणाला. डब्ल्यूडब्ल्यूई कारकिर्दीव्यतिरिक्त जॉन सीनाने हॉलिवूडमध्येही काम केले. त्याने द इंडिपेंडंट, फास्ट एक्स आणि द सुसाइड स्क्वाड सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

Protected Content