धक्कादायक : स्कूल व्हॅनचालकाने केला चिमुकलीचा विनयभंग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीसोबत सेन्टपॉल इंग्लिश स्कूलच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ४ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुकयातील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चिमुकली ही भुसावळ शहरातील सेन्टपॉल इंग्लिश स्कूल येथे शाळेत असतांना १ जुलै रोजी स्कूल व्हॅननचा चालक प्रसाद हिरासिंग चौधरी रा. भुसावळ याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चिमुकली व्हॅनमध्ये बसलेली असतांना त्याने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावून दुखापत करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने गुरूवारी ४ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्कूल व्हॅन चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.

Protected Content