Home Cities अमळनेर अमळनेर विमा शाखेतील अपघाती विम्याचे वीस लाख विमाप्रतिनिधीच्या वारसाला प्रदान

अमळनेर विमा शाखेतील अपघाती विम्याचे वीस लाख विमाप्रतिनिधीच्या वारसाला प्रदान


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शाखेतील विमा प्रतिनिधी कै. प्रविण नाना पाटील रा. तांबेपूरा ता अमळनेर याचे पाडसे गावाजवळ मोटार सायकलने ७ फेब्रुवारी रोजी अपघात होवून निधन झाले होते. आँल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन आँफ इंडियाच्या पश्चिम क्षेत्रिय लियाफी मार्फत अपघाती विमा काढण्यात आला होता.

२ जुलै रोजी विमाप्रतिनिधींच्या मेळाव्यात वीस लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट कै. प्रविण नाना पाटील यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा प्रविण पाटील यांना पश्चिम क्षेत्र अध्यक्ष सुधीरजी पाध्ये, खजिनदार प्रमोद छाजेड, नाशिक विभागाचे सचिव पद्माकर साळुंखे नाशिक विभागाचे अध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अमळनेर शाखेचे अध्यक्ष अनिल वाणी अध्यक्ष सुनील पाटील, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष,नरेंद्र पाटील, राजेंद्र महाजन, सचिव कुंदन पवार, संघटक अनिल जाधव, संजय चौधरी, महिला संघटक सुनंदा चौधरी, छाया पाटील, सदस्य मोहन वाडकर, राजेंद्र कोठावदे, विलास पाटील, सिताराम पाटील, उमेश चौधरी, गंभीर महाजन, यांच्या सहआदि विमा प्रतिनिधी उपस्थित होते.


Protected Content

Play sound