यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी गावातील प्रभाग क्रमांक ४/५ मध्ये गेल्या काही दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असुन, गावात होणारा दुषित पाणीपुरवठा त्वरित बंद करुन शुध्द व सुरळीत करण्यात यावा अशा मागणीचे तक्रार निवेदन ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह पंचायत सामितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, साकळी (ता.यावल) या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येथील भवानी पेठ प्रभाग ४/५ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुषित व कमी दाबाचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ग्रामपंचायतच्या अशा दुर्लक्षित कारभारामुळे या प्रभागातील महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत साकळी ग्राम पंचायतचे सरपंच यांच्या ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार सुचना देऊनही त्यांच्याकडून सदर विषयाची दखल न घेता अशम्य दुर्लक्ष करण्यात आले.या दूषित पाण्यामुळे भवानी पेठ भागात काही रहिवाशांमध्ये पोटदुखी, मळमळ,उलट्या,डायरिया आदी लक्षणे व रुग्ण आढळून आले आहेत.
भविष्यात या प्रभागातील कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यास बाधा आल्यास अथवा दगावल्यास संबंधीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील शिवाय सदर समस्या लवकरात लवकर न सुटल्यास हेच दुषीत पाणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना जबरीने पाजून पुढील उद्भवणाऱ्या परीस्थीतीस संबंधीत प्रशासन जबाबदार राहील असे आशयाचे निवेदन सामाजीक कार्यकर्ते विलास पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत, ग्रमविस्तार अधिकारी यांचेसह पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यावल, तालुका आरोग्य अधिकारी यावल आदींना देण्यात आले आहे.