Home क्राईम गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
51


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की सीमा बॉर्डरवर नाका तपासणी दरम्यान अवैधपणे गुटखा सुगंधित पान मसाल्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने चारचाकी वाहनासह ६ लाख ४६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केल्याची घटना मंगळवारी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील करके सीमा नाक्यावर मुक्ताईनगर पोलीस हे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एका मारुती इको चार चाकी कार क्रमांक (एमएच ३० बीबी १९१६) याची तपासणी करत असताना प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत चालकाला वाहन वाहतुकीबाबत तपासणीची कागदपत्रे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी हे वाहन आणि गुटखा पानमसाला असा एकूण ६ लाख ४६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय पढार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक सुदाम रामराव व्यवहारे वय-४०, रा. फर्दापूर ता.मोताळा जि.बुलढाणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राहुल बोरकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound