![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/advt-3.jpg)
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पोलिसांनी अवैध पद्धतीने गुटखा नेणाऱ्या कारचालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये जवळपास ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थ मिळून आले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पवन मोहन गोसावी (रा. श्रीराम नगर मुक्ताईनगर, जळगांव) अस आरोपीचे नाव आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/Half-Page-1.jpg)
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड येथून जामनेरकडे सिप्ट कार क्रमांक एमएच १९ बीजे ३७७१ मधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपयि माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचून स्विफ्ट कारला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये तब्बल लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले. यात जवळपासून ४ लाख २९ हजार ९२५ रूपयांचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थासह ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण ९ लाख २९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जामनेर पोलिस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/second-advt-ap.jpg)