महिलेला शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मुंदडा नगरात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवार २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील मुंदडा नगरातील एका भागात ३१ वर्षीय महिला ह्या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून बुधवार २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता किशोर पाटील रा. मुंदडा नगर, अमळनेर याने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आणि हात पकडून विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेने रात्री १०.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी किशोर पाटील यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content