चाळीसगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील संत सखाराम महाराज दिंडीचे स्वागत करण्याची संधी यंदा डॉ.सुनील राजपूत यांना नुकतीच मिळाली होती. यावेळी डॉ.सुनील राजपूत मित्र मंडळातर्फे वारकरी सदस्यांना रेनकोट व छत्रीचे वाटप करण्यात आले.
डॉ सुनील राजपूत हे स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे त्यांची पांडुरंगाप्रती आस्था असल्यामुळे त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेतच स्वतःला धन्यता मानतात. यातूनच त्यांनी सर्व वारकरी यांची व्यवस्था व्यवस्तीत ठेवली. त्याच बरोबर प्रसाद महाराजांसोबत गावातील सर्वांची भेट करून दिली. यानंतर वारकरी सदस्यांना रेनकोट व छत्रीचे वाटप करून सर्व सदस्यांच्या चेऱ्यावर समाधान निर्माण केले. डॉ राजपूत यावेळी असे म्हणाले की, संत हभप प्रसाद महाराजांच्या मुक्कामाने नागद पंच क्रोशी खऱ्या अर्थाने पावन झाली. ‘साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ याची प्रचिति आली. याशिवाय सातशे वर्षाहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील एक चमत्कार आहे. वारी हा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे, वारी संस्कार आहे,वारी एकात्मतेचि गंगोत्री आहे, वारी मुक्तितिल आत्मनन्दाचा आणि भक्तितील प्रेमसुखाचा अनुभव आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी सोपी आहे. पुरुषार्थ व परमार्थ कसे साधायचे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालनकरावे पण हे करतांना पांडुरंगाचे स्मरण नियमित करावे. हीच खरी भक्ति होय.
शेवटी विट्ठल आरती करुन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .दिडीतील सदस्यांना रेनकोट व पावसाळी छत्रींचे वाटप करुन दिंडी पुढ़िल मार्गक्रमणसाठी रवाना झाली. दिंडिच्या नियोजनासाठी सुभाषदादा महाजन, रविंद्र राजपूत,कन्नड़चे नगराध्यक्ष संतोषभाऊ कोल्हे, भोलाभाऊ महाजन, पोलीस पाटील करतारसिंग हज़ारी, रविंद्र अमृतकार, चंद्रकांत पाटील,महेंद्र हज़ारी, जयराम महाजन, देवीदास राठोड यांच्यासह डॉ.सुनील राजपुत मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.