चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहरातील हरीओम नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवार १९ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनील कन्हैया नकवाल वय 37 रा. हरिओम नगर चाळीसगाव हा तरुण आपल्या करून कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवार १९ जून रोजी रात्री ८.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून मिथुन सुरेश गोयर रा. हरीओम नगर चाळीसगाव याने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. दरम्यान या प्रकरणी गुरुवारी २० जून रोजी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारा मिथुन गोयर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र पाटील करीत आहे.