पॉलीसीची रक्कम देण्याच्या नावाखाली तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वडिलांचे नावे असलेली पॉलिसीची रक्कम परत देण्याच्या नावाखाली रेल्वेत नोकरी करणाऱ्या भुसावळ येथील एका तरुणाची तब्बल १० लाख ७४ हजार १९४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रसाद किशोर कुलकर्णी वय-३६, रा. तुळशीनगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हे रेल्वेत नोकरीला आहे. दरम्यान ८ मार्च २०२४ रोजी त्यांना भालचंद्र व रामचरण नाव सांगणारे दोन जणांनी मोबाईवर संपर्क साधाला व वडिलांच्या नावे असलेली पॉलिसीची रक्कम परत देतो असे सांगून त्यांनी काही कागदपत्रे त्यांना पाठवली, त्यानंतर प्रसाद कुलकर्णी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने तब्बल १० लाख ७४ हजार १९४ स्वीकारले. दरम्यान पॉलिसीची रक्कम कोणत्याही पद्धतीने मिळाली नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी गुरुवार २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार भालचंद्र आणि रामचरण नाव सांगणारे अज्ञात दोन मोबाईल धारकांवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Protected Content