बंगळुरु-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टीम इंडिया आणि कर्नाटकचा माजी कसोटीपटू डेव्हिड जॉन्सनचे बंगळुरुमध्ये निधन झाला आहे. तो 52 वर्षांचा होता. डेव्हिडने त्या घराच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीवरुन पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. जॉन्सनच्या निधनानंच वृत्त समजताच बंगळुरु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.
जॉन्सनच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. त्याने 1996 साली दोन टेस्ट मॅच खेळल्या. त्यामध्ये 3 विकेट्स घेतल्या. जॉन्सननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 39 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या. त्यामध्ये 125 विकेट्स घेतल्या. जॉन्सननं 1995-96 च्या रणजी ट्रॉफी सिझनमध्ये केरळविरुद्ध 152 रन देत 10 विकेट्स घेत भारतीय क्रिकेटमध्ये खास ओळख बनवली होती.