रावेर प्रतिनिधी । श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथुन देव दर्शन घेतल्यानंतर ओकारेश्वर ते पंढरपूर सायकल वारीस प्रारंभ झाला. रावेर येथे सायकल वारीचे आगमन होताच वारकऱ्याचे स्वागत, माजी नगर अध्यक्ष रमेश महाजन, रामभाऊ महाजन, सामाजीक कार्यकते बाळु महाजन, गोपाल भोई, संजय भोई यांनी पुष्पहार घालुन स्वागत केले.
काही भाविकांनी वारकऱ्याना औषधे वाटप केली. ह.भ.प. दशरथ भोई, गोपाल कासार यांच्या नेतृत्वाखाली ही सायकलवारी पंढरपूरकडे निघाली आहे. शरत भोई, संजय महाजन, गोविंदा भोई, कैलास भोई, कडू बारी, सुनील महाजन, अनिल मिस्त्री, गोकुळ राजपूत, प्रभाकर पाटील यांनी सायकल वारीत सहभाग आहे. सायकलवारीची गेल्या 21 वर्षापासूनची परंपरा हे जोपासत आहे. रावेर वासीयान कडुन भावपूर्ण वातावरणात वारकऱ्यांना निरोप देण्यात आला.