पहूर येथील साखळी उपोषण स्थगित : २८ रोजी होणार निर्णय

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुकयातील पहूर पेठ येथील वाघुर नदीच्या तीरावर श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिराजवळ असलेल्या हिंदू स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी वाघूर विकास आघाडीतर्फे कालपासून सुरू असलेले साखळी उपोषण निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की , पहूर पेठ येथील हिंदू स्मशानभूमी नजीक होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे यासंदर्भातत वाघूर विकास आघाडीतर्फे सुकलाल बारी व सहकाऱ्यांनी तहसीलदारांकडे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. अतिक्रमण न काढल्यास साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता . त्यानुसार कालपासून साखळी उपोषण सुरू होते. तथापि या प्रकरणी अतिक्रमण धारक तजमुलखा अजीज पठाण भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय जामनेर येथे सुनावणी सुरू असून याविषयी अंतिम निर्णय २८ जून रोजी घेण्यात येणार आहे . त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या खुलासा प्राप्त होताच त्वरित अतिक्रमण काढण्याविषयी न्यायोचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नानासाहेब आगळे यांनी दिल्याने संबंधित साखळी उपोषण मागे घेण्यात आले. निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर , पोलीस निरीक्षक सचिन सानप , मंडळ अधिकारी श्रीमती मृणाल उंबरकर , तलाठी प्रमोद इंगळे यांच्यासह ग्रामपंचायात सदस्य अशोक जाधव , सुधाकर शिंनगारे , ज्ञानेश्वर घोलप , रवींद्र पांढरे ग्रामस्थ , पत्रकार उपस्थित होते.

Protected Content