जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ परिसरातील सुरेश नगरात राहणारे सुरेखा पंडीत पालवे वय ५४ यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ३३ हजार ७०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी १७ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले. याप्रकरणी मंगळवारी १८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा पालवे या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ६ जून ते १७ पर्यंत त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे दानिगे आणि रोकड असा एकुण ३३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी १७ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. त्यांनी मंगळवारी १८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.