जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी १७ जून रोजी सायंकाळी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ८० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोरआली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यात ३० जणांना अडावद येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेतले आहे. तर इतरांना चोपडा आणि जळगाव येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेला योग्य त्या सुचना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, चोपडा तालुक्यातील कमळगाव आणि आजूबाजूच्या चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ सोमवारी १७ जून रोजी संध्याकाळी आठवडे बाजारासाठी आले होते. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी १८ जून रोजी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली.
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. यापैकी डिंपल कोळी (वय-१६), आयर्न सपकाळे (वय-७), पवन सोनवणे (वय-१३), निकिता कोळी (वय-१३), चेतना सपकाळे (वय- १९) यांच्यासह ३० जणांना उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तर जळगाव जिल्हा रूग्णालयात रूद्राक्षी किरण धनगर वय -५, साक्षी संजय इंगळे वय ४१, धनराज संजय इंगळे वय १५ आणि विद्या समाधान इंगळे वय ३४ सर्व रा. मितावली पिंप्री ता. चोपडा यांना जळगाव दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. तर ज
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाले व तपासणी यंत्रणा हलविण्यात आली.