अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील 21 वर्षीय तरुणाने डी.डी. नगरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार 17 जून रोजी दुपारी 1 वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिद्धेश उर्फ हर्षल संजय चौधरी वय – 21 रा. डी डी नगर अमळनेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सिद्धेश चौधरी हा तरुण आपल्या परिवारासह डी डी नगर परिसरात वास्तव्याला होता. दरम्यान त्याने सोमवारी 17 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास डी डी नगरात असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व आक्रोश केला. दरम्यान तरुणाने आत्महत्या का केली याची माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी अमळनेर पोलिसांनी गाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे करीत आहे.