Home Cities जामनेर पहुर येथील स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी साखळी उपोषण

पहुर येथील स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी साखळी उपोषण


पहूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अतिक्रमणामुळे पहूर पेठ येथील वाघुर नदीच्या तीरावर केवडेश्वर मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीचा श्वास गुदमरतो आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी वाघूर विकास आघाडीतर्फे बेमुदत साखळी उपोषण आंदोलनास मंगळवार १८ जून रोजी पासून सुरुवात करण्यात आली.

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथे वाघुर नदीच्या तीरावर केवडेश्वर मंदिराजवळ हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीलगत अतिक्रमण झालेले आहे . या अतिक्रमणामुळे शोकाकुल बांधवांना उभे राहण्यासाठी देखील पुरेशी जागा नसते . दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच असून याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे . गेल्या वर्षी देखील वाघूर विकास आघाडीतर्फे स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी घंटानाद आंदोलन करून जागा मोजणीसाठी लोकवर्गणीतून शासकीय शुल्क भरले.प्रशासनाने अतिक्रमण काढण्यात येईल , असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले . मात्र वर्ष उलटले तरी अतिक्रमण ‘जैसे थे ‘ आहे . त्यामुळे तिसऱ्यांदा वाघूर विकास आघाडीच्या वतीने पहूर बस स्थानकावर ग्रामपंचायत समोर सुकलाल बारी , भाऊराव गोंधनखेडे , सुधाकर शिनगारे , सुनील सोनार , ज्ञानेश्वर घोलप दिलीप पांढरे , विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज पासून लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली . ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, भगवान कुमावत यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.


Protected Content

Play sound