नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसचे नेते राहुल गांधी वायनाड व रायबरेली या मतदारसंघांतून खासदार झाले होते. नियमानुसार एक जागा सोडावी लागेल. राहुल यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तेथून त्यांची बहिण प्रियंका गांधी आपली पहिली निवडणूक लढतील.
२००४ मध्ये सर्वप्रथम प्रियंकांनी लोकसभा प्रचारात सहभाग घेतला. सोनियांसाठी रायबरेलीत तर राहुल यांच्यासाठी अमेठीची धुरा त्यांनी सांभाळली. नंतर २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांना पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी मिळाली. प्रियंका राजकारणात येणाऱ्या गांधी घराण्यातील चौथ्या महिला, नवव्या सदस्या आहेत. इंदिरांनी ५० व्या वर्षी १९६७ मध्ये पहिली लोकसभा लढवली. मनेका २८ व्या वर्षी १९८४ मध्ये लढल्या. सोनियांनी ५३ व्या वर्षी १९९९ मध्ये अमेठीतून कारकीर्द सुरू केली. आता दक्षिणतेून पहिली निवडणूक लढवणाऱ्या प्रियंका या पहिल्या गांधी आहेत.