अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गोदावरी नगरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार १६ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, निलेश शामराव ठाकरे वय-३२, रा. गोदावरी नगर अमळनेर हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता निलेश हा घर बंद करून कामावर निघून गेला. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हे बंद कर फोडून घरातून सोन्याची दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. रविवारी १६ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी त्यांनी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीसचा धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.