बोदवड प्रतिनिधी । मुस्लीम धर्मियांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जमियत उलेमा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
जमियत उलेमा या संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात अलीकडे मुस्लिमांवर आकारक हल्ले वाढत आहे. झारखंड मध्ये झालेल्या तबरेझ नावाच्या व्यक्तीवरी अकारण हल्ला ज्या लोकांनी केला त्यांच्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी. व देशात होत असलेले मुस्लिम समाजावरील हल्ले थांबवण्यासाठी अट्रासिटी कायदा सारखा कायदा अंमलात आणावा. यामुळे मुस्लीम समाजावरील व्यक्तींवर होणारे हल्ले कुठं तरी थांबतील व मुस्लिम समाजाला न्याय मिळेल अशी मागणी यात करण्यात आली आहे.
संबंधीत निवेदन देतांना जमियते उलेमा चे मौलवी अमीन पटेल यांच्यासह हाफिज फ़िरोज़ मौलवी, इश्तियाक,हाफिज महबूब,आदिल खान,अरबाज़ शेख,इरशाद कुरैशी, शारुख शेख,लुकमाने पिंजारी,नईम खान, तसेच तइ- चे सलीम शेख, महेंद्र सुरडकर, सुपड़ा निकम, सुभाष इंगळे, सोपान इंगळे,राहुल मोरे, जगन गुरचळ आदींची उपस्थिती होती.