Home राजकीय रक्षाताई खडसे यांनी स्वीकारला मंत्रालयाचा कार्यभार !

रक्षाताई खडसे यांनी स्वीकारला मंत्रालयाचा कार्यभार !

0
117

नवी दिल्ली-वृत्तसेवा | दोन दिवसांपूवी राज्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर आज ना. रक्षाताई खडसे यांनी आपल्या खात्याचा कार्यभार सांभाळला आहे.

आरावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचीत खासदार रक्षाताई खडसे यांनी रविवारी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री बनल्या आहेत. काल शपथविधी झाल्यानंतर त्यांना नेमके कोणते मंत्रालय मिळणार ? याबाबत उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, त्यांच्याकडे काल सायंकाळी क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

यानंतर आज ना. रक्षाताई खडसे यांनी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची धुरा सांभाळली. त्यांनी भारताला क्रीडा क्षेत्रात पॉवर हाऊस तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.


Protected Content

Play sound