चोपडा (प्रतिनिधी) येथील म. गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इयत्ता १२ वी विज्ञान वर्गाच्या तीन विद्यार्थ्यांनी जेईई २०१९ परीक्षेत घवघवीत यश मिळवून त्याआधारे आय.आय.टी. व एन.आय.टी. ला नंबर लावून महाविद्यालयाच्या मुकूटात मानाचा तुरा खोवला आहे.
रत्नेश संभाजीराव भोसले, आय.आय.टी. खरगपूर, कु.धनश्री अशोक पाटील, एन.आय.टी. सुरत व नरेंद्र राजू पाटील एन.आय.टी. कर्नाटक या विद्यार्थ्यांची उच्च अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिघेही यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी. पाटील, अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष सौ. आशा विजय पाटील, सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.एल. चौधरी, प्रा.एम.बी. हांडे, डॉ.के.एन. सोनवणे, ज्यु.कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे, पर्यवेक्षक व्ही.वाय. पाटील, रजिस्ट्रार डी.एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.