भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंस्टाग्रामवर ओळख निर्माण करून २० वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिला मध्यप्रदेशातून पळून आणत, भडगाव तालुक्यातील एका गावात तिच्यावर अत्याचार करून धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ८ जून रोजी दुपारी २ वाजता भडगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर रमेश सोनवणे रा. भडगाव जि.जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील बडवाणी गावात २० वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. तिची इंस्टाग्रामवरून किशोर सोनवणे याच्यासोबत ओळख निर्माण झाली. दरम्यान १४ मे ते ३० मे दरम्यान संशयित आरोपी किशोर सोनवणे याने तिला मध्यप्रदेशातून पळून नेत भडगावला आणले. आणि या ठिकाणी तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने भडगाव पोलिसात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी किशोर रमेश सोनवणे यांच्या विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.