जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालत तिचा हात पकडून विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सन २०२१ पासून गावात राहणारा निलेश हिरामण मराठे हा पिडीत मुलीला लग्नाची मागणी केली. त्यावर पिडीत मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना ११ एप्रिल २०२४ रोजी घडली. त्यानंतर पिडीत तरूणीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलीने जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निलेश हिरामण मराठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे हे करीत आहे.