रावेर प्रतिनिधी । मराठा आरक्षण वैध असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्रपणे १२ व १३ टक्के आरक्षण शक्य झाले आहे. या निर्णयाचे रावेर येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून मराठा समाजात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, माजी जि.प. सभापती सुरेशभाऊ धनके, भाजप उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी पं.स.सभापती मिलिंद वायकोळे, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, स्वाती चौधरी, पं.स. सद्स्य योगिता वानखेडे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील, गोपाळ नेमाडे, महेश चौधरी, शिवाजीराव पाटील, पं.स. सदस्य पी.के. महाजन, संजय गांधी योजने अध्यक्ष विलास चौधरी, अहमद जबरा, पवन चौधरी, नथ्थु धांडे, सलीम तडवी, मनोहर तायडे, मनोज श्रावक, भास्कर बारी, अजबराव पाटील, सी.एस. पाटील, नगरसेवक यशवंत दलाल उपस्थित होते.