कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोकण पदवीधर निवडणूकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना अद्याप शिवसेना शिंदे गटाने उमेदवार निश्चित केला नाही. शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे इच्छुक असताना पनवेलमधील शिवसेनेच्या गटाने मंगेश रानवडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे शिवसेनेत ताळमेळ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात मागील निवडणूकीपेक्षा दुप्पटीने मतदारांची संख्या वाढली असून सध्या कोकण पदवीधर मतदारसंघात २ लाख ३ हजार मतदारांची नोंद झाली आहे.

रायगड जिल्ह्यात ५३ हजार मतदार असून यापैकी २० हजार मतदार पनवेलमधील आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात ९५ हजार मतदार आहेत. यापूर्वीच्या निवडणूकीत निरंजन डावखरे यांना ३२ हजार पदवीधरांनी पसंदी दर्शविल्याने ते या मतदारसंघातून आमदार झाले. मात्र त्यावेळेस एक लाखावर मतदार संख्या होती. सध्या दुप्पटीपेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात वाढले आहेत. मतदारांप्रमाणे इच्छुक उमेदवारांची संख्या मतदारसंघात मोठी झाली आहे. अद्याप या मतदारसंघात चौरंगी लढत होणार की दुरंगी की तिरंगी हे अद्याप ठरलेले नाही. ७ जून ही या निवडणूकीत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असली तरी शिवसेनेचा एबी फॉर्म संजय मोरे यांना मिळणार की पनवेलचे इच्छुक असलेल्या मंगेश रानवडे यांना मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Protected Content