वरणगाव खून प्रकरणी पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आरीफ अली समद अली रा. गौसिया नगर, वरणगाव या तरूणाचा धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी ४ जून रोजी दुपारी दीड वाजता मराठे पानमंदीर परिसरात घडली होती. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील गौसिया नगरात आरीफ अली समद अली हा तरूण वास्तव्याला होता. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी ४ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात आरीफ अलीचा मित्र आकीब अली यांचे काका मुश्ताक अली लाल सैय्यद यांच्यासोबत काही तरूणांचे वाद सुरू होता. त्यावेळी तरूणांनी मुश्ताक अली याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हे पाहून आरीफ अली समद अली यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने तरूणांनी आरीफ अलीवर चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

याप्रकरणी रात्री ११.३० आकीब अली कमर अली याने दिलेल्या फिर्यादीवरून राहील सईद सैय्यद उर्फ पैलवान, करीम हारूण मणियार, रेहाण उर्फ बबलू खालीद सैय्यद, अरबाज सैय्यद उर्फ पैलवान, मुजाहीत सैय्यद उर्फ इंजिनिअर सर्व रा. वरणगाव ता. जळगाव यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहे.

त्याने त्याची दुचाकी लावली होती. त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली. यामधूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने तरुणावर चॉपरने तिघांवर प्राणघातक हल्ला केला.

Protected Content