धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावातील एका भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणीसह तिच्या आईला मारहाण करून तरूणीचा हात पकडून विनयभंग करत अश्लिल हावभाव केल्याची घटना रविवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी ३ जून रोजी दुपारी ४.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा हार्दीक विजय भिल याने तरूणीसह तिच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धटना रविवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. त्यानंतर तरूणीला अश्लिल हावभाव करत तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच हार्दीकचे नातेवाईकांनी देखील दोघांना मारहाण केली. याप्रकरणी तरूणीने सोमवारी ३ जून रोजी दुपारी ४.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार हार्दीक विजय भिल, अजय विजय भील, विजय सोमा भिल, सोमा धुरसिंग भिल, मंजूबाई विजय भिल, भारतीबाई सोमा भिल सर्व रा.पिंपळे ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंदूलाल सोनवणे हे करीत आहे.