जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विचार वारसा फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामेश्वर कॉलनी परिसरातील दहावी व बारावी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार १० जून २०२४रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची प्रत विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे जमा करणे आवश्यक आहे.
ही प्रत संयोजनाच्या दृष्टीने ७ जूनपर्यंत आपण जमा करू शकतात. हे आयोजन विचार वारसा फाउंडेशन कार्यलय चौक, हरेश्वर हनुमान मंदिर मोठी पिण्याची टाकी समोर रामेश्वर कॉलनी येथे आयोजन करण्यात आले आले.
यासाठी आशिष राजपूत,अभिजित राजपूत,मयुर डांगे, अमोल ढाकणे,आकाश तोमर, ऋषि राजपूत, राहुल राजपूत, गौरव डांगे,संकेत म्हस्कर, अजय मांडोळे, चेतन राजपूत, लोकेश निकम, प्रकल्प प्रमुख, विद्यार्थी गुणगौरव समिती हे परिश्रम घेत आहे.