रेशन दुकानात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बेलव्हाय आणि शहरातील महादेव मंदीराजवळ दोन रेशन धान्य दुकानातील धान्याचा काळा बाजार करून विक्री करणाऱ्या दोन रेशनधारकांवर सोमवारी ३ जून रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील सुरेखा नारायण वाणी आणि भुसावळ शहरातील महादेव मंदिराजवळील एन. एम. बऱ्हाटे यांच्या रेशनदुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती पुरवठा निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार भुसावळ तालुक्याचे पुरवठा निरीक्षक अतुल नागरजोगे यांनी ८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान कारवाई केली. यामध्ये नागरिकांसाठी वितरण करण्यात येण्यात येणारे स्वस्त धान्य काळाबाजारात विक्री होत आल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये जवळपास ६ लाख ४३ हजार हजार रुपयांचा धान्याचा काळाबाजार केल्याचे समोर आले. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक अतुल नागरजोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ३ जून रोजी दुपारी १ वाजता रेशन दुकानदार सुरेखा नारायण वाणी आणि देवेंद्र नारायण वाणी या दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र भावसार हे करीत आहे.

Protected Content