भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून परप्रांतीय १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ मे रोजी पहाटे ४ वाजता समोर आले आहे. याबाबत रविवारी २ जून रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे १३ वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ मे रोजी पहाटे ४ वाजता अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना घडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानुसार रविवार २ जून रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे ह्या करीत आहे.