प्रज्वल, सिद्धीसह ‘त्या’ सात मुलांचे संगीत कलेचे वाढीव गुण अखेर प्राप्त

admission 4

जळगाव (प्रतिनिधी) येथील शानभाग विद्यालयातील सात विद्यार्थ्यांना नाशिक बोर्डाच्या नजरचुकीने १० वीच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत मिळणार असलेले संगीत कलेचे वाढीव गुण देण्याचे राहून गेले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दोन व तीन टक्के मार्क्स कमी मिळाले होते. त्यांना आज वाढीव मार्कांसह नवी सुधारित गुणपत्रके देण्यात आली आहेत.

 

सविस्तर वृत्त असे की, या मुलांना आधी मिळालेल्या गुणपत्रकात हे गुण समाविष्ट करण्याचे नाशिक बोर्डाकडून राहून गेले होते. त्याचवेळी शाळेतील इतर कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मात्र गुण वाढवलेले होते. ही बाब विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असता, शानभाग विद्यालयाच्या प्रशासनाने त्वरित सकारात्मक पुढाकार घेवून बोर्डाशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे अवघ्या २० दिवसात या सात मुलांना त्यांचे वाढीव गुण प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये शाळेतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रज्वल पाटीलचाही समावेश आहे. त्याच्यासोबत सिद्धी उपासनी, अथर्व मुंडले, श्रेयस महाजन, केतकी गोहिल, उत्कर्षा अत्तरदे व बोरसे या विद्यार्थ्यांनाही हे वाढीव गुण मिळाले आहेत.

Protected Content