जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील माहिजी ते म्हसावद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे खंबा जवळ शनिवारी १ जून रोजी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
राजेंद्र पाटील (वय-५०, रा. पिंपळगाव ह.मु. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते जळगांव येथील खाजगी पेट्रोल पंपावर कामकाज करीत होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, अविवाहित मुलगा असा परिवार आहे. मुलगा स्वप्निल पाटील हा दुबई येथे कामकाजानिमित्त गेला आहे. राजेंद्र पाटील हे ३१ मे रोजी पाचोरा येथे त्यांचे नातेवाईकात असलेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आले होते. पाचोरा येथून जळगाव येथे परतीचा प्रवास करीत असताना काळाने झडप घातली अन धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, घटनेची माहिती प्राप्त होताच पाचोरा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह दाखल करण्यात आला होता.