अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यात एका तरुणीवर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तरुणीची छेड काढली जात असताना तिने विरोध केल्याने तिच्यावर एका तरुणाकडून हातात असलेल्या स्क्रूड्रायव्हरने वार करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यानंतर तरुणी जागेवर खाली कोसळली, संबधीत तरुणीने आरडाओरडा केल्याने मोठी दुर्घटना टळली.
तरुणीने आरडाओरडा केल्याने हल्ला करण्यासाठी आलेला हल्लेखोर तरुण आणि त्याचा साथीदार पळून गेला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराफा बाजारात ही घटना घडली आहे. माय-लेकी रस्त्यावरून जात असताना दोन तरुणांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीच्या आईने याला विरोध केला असता तिच्यावर तरुणाने हल्ला केला, मात्र तरुणी मध्ये आल्याने तिला हल्ल्याचा सामाना करावा लागला. हा संपूर्ण प्रकार सराफा बाजारातील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.