खतरनाक ! गुरूवारी नागपूरमध्ये @५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण भारतात तापमानाचा पारा कमी होण्याचे नाव घेत नाही. उष्णतेच्या झळा जीव कातावून टाकत आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. नागपूरची अक्षरश: भट्टी झाली आहे. तिथे काल गुरुवारी तब्बल ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. इथल्या तापमानात अनपेक्षित वाढ झाली आहे. उष्णतेमुळं लोक हैराण झाले असून, एवढी उष्णता का व कशी होत आहे, हेच झाले आहे.

भारतीय हवामान विभागानंही वाढत्या उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील तापमान ५२.९ अंशांवर पोहोचल्यावर आयएमडीनं तपासाचे आदेश दिले होते. आता नागपुरातही तापमान मोजताना काही चूक झाली का, याची चौकशी सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागानं नागपुरात स्थापन केलेल्या चार स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी दोन केंद्रांनी ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान दाखवलं आहे. हे तापमान दिल्लीतील विक्रमी तापमानापेक्षाही जास्त आहे.

नागपूरच्या उत्तर अंबाझरी रोडपासून दूर असलेल्या रामदासपेठ येथे पीडीकेव्हीच्या २४ हेक्टर खुल्या कृषी क्षेत्राच्या मध्यभागी स्थापित नागपूर मध्ये ५६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. याशिवाय सोनेगावच्या प्रादेशिक हवामान केंद्रात ५४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा रोडवरील खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शेतात असलेल्या तिसऱ्या हवामान केंद्रात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर रामटेक येथे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Protected Content