शहरातील गटारींच्या निकृष्ट कामात आर्थिक भागीदारीमुळे न.प. प्रशासनाची कार्यवाहीस टाळाटाळ

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात न.प. हद्दीत डॉ. गिरीश पाटील यांच्या घरापासून ते बोदवड रोड पर्यंत लाखो रुपयांचे गटारीचे काम हे अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन सुरू असून पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून आर्थिक हितसंबंधापोटी संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा शहरात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुकाध्यक्ष अमोल बोदळे यांनी यांनी पत्रकार परिषद द्वारे केला आहे. विशेष खेदाची बाब म्हणजे या निकृष्ट कामाबाबत विविध राजकीय तसेच सामाजिक संघटना वारंवार तक्रारी करत असून त्या आशियाच्या बातम्या विविध दैनिक लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये वारंवार प्रसिद्ध होत आहेत.

अंदाजपत्रकानुसार सदर गटारीचे खोदकाम केल्यानंतर पिचिंग केल्यानंतरच त्यावर स्टील टाकून कॉंक्रिटीकरण करणे बंधनकारक होते परंतु संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत डायरेक्ट काड्या मातीवरच काँक्रीट टाकलेले असून त्यामुळे भविष्यात नैसर्गिक तत्त्वानुसार काळी माती दबून निकृष्ट काँक्रीट मध्ये तळे जाऊन सदर काँक्रीट मधून पाणी जमिनीत पाझरून संपूर्ण गटारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सदर गटारीच्या कामांमध्ये वापरण्यात येणारी वाळू सुद्धा अत्यंत निकृष्ट माती मिश्रित आहे. त्यामुळे नगरपंचायत च्या नफा फंडातून शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून संबंधित पर्यवेक्षक अधिकारी व ठेकेदार यांचाच विकास होत आहे की काय असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारात आहे.

नगरपंचायत प्रशासनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे सदर ठेकेदार एवढ्यावरच थांबलेला नसून सदर निकृष्ट कामांमध्ये वापरण्यात येणारे स्टील ही अंदाजपत्रकानुसार नसून ८ एम एम स्टील वापरणे बंधनकारक असताना सदर ठेकेदार कडून फक्त ६ एम एम स्टील चा वापर करून त्यांची करण्यात येणारी बांधी ही सुद्धा लांब लांब अंतरावर घेतलेली आहे. तसेच सुरू असलेल्या सदर काँक्रीटच्या कामावर एवढ्या उष्ण तापमानात सुद्धा आजतागायत एकदा सुद्धा पाणी मारण्यात आलेले नाही. परंतु शहराच्या नगररचनेचा सत्यानास होताना नगरपंचायत प्रशासनाला दिसत नाही कारण त्यांच्या डोळ्यांवर आर्थिक पट्टी ठेकेदाराने घट्ट बांधलेली आहे.यावरून एकंदरीतच मुक्ताईनगर नगरपंचायतच्या नफा फंडातून काढण्यात येणारी गटारी जनतेच्या सोयीसाठी नसून पर्यवेक्षक अधिकारी व ठेकेदारासाठी असल्याचे एकंदरीत सिद्ध होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुकाध्यक्ष अमोल बोदळे यांनी यांनी पत्रकार परिषदद्वारे केला आहे

Protected Content