Home क्राईम किरकोळ कारणासाठी लोखंडी रॉडने दोघा भावांना बेदम मारहाण

किरकोळ कारणासाठी लोखंडी रॉडने दोघा भावांना बेदम मारहाण


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पातालनगरी परिसरात राहणाऱ्या दोन भावांना किरकोळ कारणावरून गल्लीत राहणाऱ्या काही जणांनी लोखंडी सळई, लाकडी दंडाक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 23 मे रोजी सकाळी 7 वाजता घडली. या प्रकरणी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता धरणगाव पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अब्दुल रहमान शेख बाबा वय-28, रा. पातालनगरी धरणगाव या तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. 23 मे रोजी सकाळी 7 वाजता अब्दुल रहमान शेख बाबा आणि त्याचा भाऊ बिस्मिल्ला शेख या दोघांना किरकोळ कारणावरून गल्लीत राहणारे कलाम अब्दुल करीम, कलंदर अब्दुल करीम, अजित अब्दुल कलाम, इमरान खान मोहम्मद खान आणि अल्ताफ शेख शाकीर सर्व रा. संजय नगर जळगाव या 5 जणांनी दोन्ही भावांना लोखंडी रॉड आणि लाकडी दंडाक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवार 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound