Home क्राईम भुसावळातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

भुसावळातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून चोरवड गावी नेत तिच्या सोबत अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची घटना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवारी २० मे रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी सिध्देश विजय पाटील रा. भुसावळ याने १७ मे रोजी सकाळी ११ वाजता पिडीत मुलीला दुचाकीवर बसून चोरवड गावी घेवून गेला. तिथे तिच्यासोबत अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पिडीतेसह नातेवाईकांनी सोमवारी २० मे रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सिध्देश विजय पाटील रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound