रत्नागिरी जिल्हयात कारने दोन पादचारी तरूणांनी उडवले; भरधाव नसल्याने बचावले

रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रत्नागिरी जिल्हयात दोन पादचारी तरूणांना कारने उडवल्याची घटना घडली आहे. मात्र दोन्ही तरूण सुदैवाने बचावले आहे. ही घटना जिल्हयातील मंडणगड शहरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोड दोन तरूण शहरात सामान खरेदी करून बसस्थानकाकडे जात होते. अचानक पाठीमागून आलेल्या कारने त्या दोन तरूणांना उडवले. परंतू कार भरधाव वेगात नसल्याने दोन्ही तरूण बोनेटवर आदळल्याने बचावले. परंतु तरुणांना उडवणाऱ्या कारचालकाला मात्र नागरिकाच्या रोशाला बळी पडावे लागले. काही काळ वातावरणही तंग झाले होते.

Protected Content